ट्रन्सवर्ल्ड ट्रेडफेअर - दिल्ली १९८२ या जागतिक प्रदर्शनात सुवर्णपदक देऊन गौरविलेले आरोग्य पेय. आयुर्वेदिक औषधी उत्पादन म्हणजे कोकांबा. कोकणच्या रातांब्याचे अमृतपेय. पाहुण्यांचे आदरातिथ्याकरीता कोकांबा ठेवा घरात. कोकांबा हे कोकणातील रातांबा फळाचे शुद्ध साखरेचे, चवदार घट्ट, सरबत होय. ज्या प्रमाणात घ्याल त्याचे सातपट पाणी मिसळावे. चांगले पेय होते. कोकांबा हे तृष्णाशामक, पित्तशामक आहे . जेवणानंतर पाचक म्हणून म्हणून प्यावे. जागरण करणारे कलावंत, विध्यार्थी, व्यापारी, कामगार या सर्वाना हितावह आहे. कोणत्याही ऋतुमधे घेता येते.
उन्हाळ्यात अवश्य घ्यावे. उन्हाळ्यातील उष्णतेचे त्रास, डोळ्यांची आग, अंगावरील पित्ताच्या लाली याने कमी होऊन तरतरीतपणा वाटतो. हे पेय उत्साहवर्धक आहे. या मध्ये आवळा, जिरे, सैंधव, आले यांचा वापर केलेला आहे. लग्न समारंभ, वाढदिवस, बारसे, पार्टी, व संमेलनामध्ये कोकंबा देऊन स्वागत करा.